पुणे – ८० लाख रूपये किमतीचे 4 हस्तीदंत एका व्यक्तीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून हस्तीदंत जप्त करण्यात आले आहेत.
भीमा बोगरिया मुदावत(वय ५०) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा तेलंगणा राज्यातील रहिवासी आहे. दरम्यान त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.