दिल्ली विमानतळाला गुरू नानक यांचे नाव देण्याची शिख समुदायाची मागणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज अमेरिकेतील ह्युस्टन शहरात मोदींचे खूप व्यस्त वेळापत्रक आहे. पीएम मोदी रविवारी भारतीय वंशाच्या 50 हजार लोकांना हाऊडी मोदी या कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. दरम्यान, यापुर्वी पंतप्रधान मोदी यांनी ह्युस्टन शहरात शीख समुदायाच्या लोकांची भेट घेतली. यावेळी शीख समाजातील लोकांनी पंतप्रधान मोदींचे हार्दिक स्वागत केले आणि भारताच्या विकासात त्यांच्या योगदानाचे आश्वासन दिले. तसेच यावेळी शिख समुदायाच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीच्या विमानतळाला गुरुनानक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.

भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल शीख समुदायाच्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले व निवेदन दिले. शीख समुदायाने पंतप्रधान मोदींना निवेदन सादर केले आणि 1984. 1984 च्या शीख दंगली, दिल्ली विमानतळ गुरु नानक देव यांच्या नावावर ठेवावे, भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 25 आणि आनंद विवाह कायदा, व्हिसा आणि पासपोर्ट या विषयांवर बोलण्याची विनंती केली. तसेच अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये बोहरा समाजाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींची भेटही घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.