हर्षवर्धन पाटील यांनी घेतले ताबुताचे दर्शन

रेडा – इंदापूर शहरातील दर्गा मशिद येथील सवारीचे मोहरमनिमित्त दर्शन घेत महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शहरातील सातपुडा, शेख मोहल्ला, बागवान गल्ली, कसबा येथील ताबूतचे (डोलाचे) फुलांची चादर वाहून दर्शन घेतले. सातपुडा येथील काझी गल्लीतील ताबूतचे दर्शन घेत त्यांनी स्वतः सबिल (सरबत) बनविले व त्याचे वाटप केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले.

मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन-हुसेन यांची याच महिन्यात यहुदी लोकांकडून कत्तल करण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ ताबूत उभारून त्या ताबूतमध्ये हसन-हुसेन यांच्या कबरीची प्रतिकृती बनवून मोहरमच्या दहा तारखेला मुस्लीम बांधव गावातून ताबूत फिरून शेवटी विसर्जन करतात. इस्लाम धर्माची सहनशिलतेचे दर्शन घडवणारा हा मोहरम सण आहे.

यावेळी नगराध्यक्ष अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,नगरसेवक भरत शहा, गटनेते कैलास कदम, बापू जामदार, शकील भाई सय्यद, जकिर काझी, मंगेश पाटील, रशीद पठाण, नितीन मखरे, जावेद शेख, लियाकत पठाण, अल्ताफ पठाण, शेखर पाटील, पांडुरंग शिंदे यावेळी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)