सेनेतील “आयारामां’चे पक्ष प्रवेश लांबणीवर?

भोसरीत शिवसेनेची ताकद

भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पारंपारिक मते आहेत. आजपर्यंत झालेल्या 2009 आणि 2014 च्या विधानसभा मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवाराला चाळीस हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. गतवेळी स्वतंत्र लढल्यानंतरही शिवसेनेच्या सुलभा उबाळे या दुसऱ्या स्थानी होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या हक्काच्या मतांवर विजयाची गणिते सोपी ठरण्याच्या शक्‍यतेने काहीजणांनी विजयाची गणिते मांडली आहेत. मात्र आयत्यावेळी प्रवेश घेतल्यास हा शिवसैनिक पक्षाचा पाठीराखा राहणार का? हे देखील पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

भोसरी  – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच भोसरी विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना भाजपामध्ये कलगीतुरा रंगला असून हा मतदारसंघ जागा वाटपात कोणाकडे जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या “आयारामां’नी “वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच शिवसेनेच्या भोसरी मतदारसंघातील इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईत मुलाखती झाल्याने मतदारसंघाच्या वाटपावरून अधिकच वातावरण तापले आहे.

शहरातील तीन मतदारसंघापैकी सध्या भोसरी हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा बनला आहे. या मतदारसंघाचे नेतृत्त्व आमदार महेश लांडगे हे करीत आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले आहे. भाजपाकडून लांडगे हे प्रबळ दावेदार असल्यामुळे त्यांनाच तिकीट मिळेल, असे वाटत असतानाच सत्ताधारी पक्षनेते आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ पवार यांनी भाजपाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपाचा उमेदवार कोण? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते.
त्यातच माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी या मतदारसंघावर शिवसेनेची दावेदारी ठोकल्याने शिवसेना आणि भाजपाच्या युतीत ठिणगी पडली आहे.

एका बाजूला शिवसेनेने केलेला दावा भाजपामधील अंतर्गत कलह, राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण? या बाबींमुळे हा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. राष्ट्रवादीचे दोन नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र विधानसभेसाठी युती झाल्यास हा मतदारसंघ कोणाकडे? हे अद्याप निश्‍चित नसल्यामुळे हे दोन्ही नेते “वेट ऍण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. तिकिटाचे आश्‍वासन हा या दोघांसाठी कळीचा मुद्दा बनलेला असतानाच कामगार नेते इरफान सय्यद आणि माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी विधानसभेची तयारी चालविली आहे. गतवेळीप्रमाणे आयत्यावेळी युती तुटण्याची शक्‍यता गृहीत धरून भोसरीचे हे दोन्ही नेते युतीतील घडमोडीकडे लक्ष ठेऊन आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)