सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 68 वी वार्षिक साधारण पार पडली

सातारा- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 68 वी वार्षिक साधारण सभा मंगळवार दि 28-08-2018 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीचे वातावरणात पार पडली बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ऱाजेंद्र सरकाळेयांनी उपस्थितांचे स्वागत केले समाजाशी, सहकार चळवळीशी, या बॅंकेशी बांधिलकी असणा-या, निधन पावलेल्या मान्यवर, कार्यकर्ते, बॅंक सेवक/माजी सेवक, तसेच देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शूरजवान याशिवाय ज्ञात, अज्ञात मृत बॅंक खातेदार,बॅंकेचे हितचिंतक इत्यादिंना सभेने दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहिली .

बॅंकेचे अध्यक्ष मा .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बॅंकेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना, बॅंक शेतकरी, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, सामाजिक बांधिलकी जपत असताना राबवित असलेल्या योजना, कृषि व ग्रामीण विकासासाठी राबवित असलेल्या विविध विकास योजना, ठेवी इ .चा उल्लेख करुन संकल्पपूर्तीची, भावी संकल्पाची माहिती दिली . मा .अध्यक्ष यांचे अध्यक्षीय भाषणानंतर सभेचे रीतसर कामकाज पार पडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले . विषयानुषंगाने सांगोपांग चर्चा होवून सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले .बॅंकेची वैशिष्टयपूर्ण कार्यप्रणाली, बॅंकेचे उत्कृष्ठ कामकाज, सक्षम व भक्‍कम आर्थिक स्थिती, बॅंकेच्या विविध व नाविन्यपूर्ण विकास योजना याबद्‌दल सभासदांनी बॅंकेच्या कामाची प्रशंसा करुन यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विकास संस्थांचे सभासदांनी विविध कर्ज योजना व कामकाजाचे अनुषंगाने असलेल्या अडीअडचणी संबंधी काही अडचणी, प्रश्‍न सभेत मांडले तसेच काही सूचना केल्या . सभासदांनी केलेल्या सुचनाबाबत विचार केला जाईल तसेच अडीअडचणी, बॅंकेच्या नवनवीन योजना, प्रश्‍न सोडवणूकीचे दृष्टीने बॅंकेचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहील व सहकार्य करेल अशी मा अध्यक्ष यांनी ग्वाही दिली . तसेच मा .मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे / शंकांचे निरसन केले.

यावेळी सभेला मार्गदर्शन करताना, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा .ना .श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरसो म्हणाले, या बॅंकेला यशवंतराव चव्हाणसाहेब, आर .डी .पाटील, आबासाहेब वीर इत्यादि थोर व्यक्‍तींचे आशीर्वाद मिळाले आहेत ..बॅंक शैक्षणिक कर्ज, ठिबक सिंचन, नियमित कर्जपरत फेड करणारे सभासदांना व्याजदरात सूट, विकास संस्था इत्यादिंसाठी नयातून प्रतिवर्षी तरतूद करीत असते . दुष्काळी भागासाठी बॅंक नेहमीच आर्थिक मदत करीत असते .

केरळमधील पुरग्रस्तांसाठी बॅंकेने रु .11 .00 लाखाची आर्थिक मदत केली आहे . कर्ज वाटप व कर्ज वसुली हा महत्वाचा भाग आहे . विकास सोसायटीचे संचालकांना अधिकार असून त्यांना अधिकाराची अंमलबजावणी करता आली पाहिजे .सोसायटयांना असलेले अधिकार कोणीही काढून घेवू शकत नाही . शेतकरी सभासद व सोसायटी यांचे चांगले सहकार्य मिळत असलेमुळेच बॅंकेची प्रगती झालेली आहे .शेतकरी सभासद भांडवली खर्चात वाढ होत असलेने अधिक कर्जाची मागणी करीत आहेत . बॅंक सभासदांच्या गरजेनुसार कर्ज वितरण करीत आहे परंतू घेतलेले कर्ज सभासदांनी वेळेत परतफेड केले पाहिजे . आज राष्ट्रीयकृत बॅंकांशी आपणास स्पर्धा करावी लागते .डिस्ट्रीक्‍ट क्रेडिट प्लॅनमध्ये पीक कर्ज वाटपाचे आपल्या बॅंकेचे प्रमाण सर्वांत जास्त आहे .आपल्या जिल्हयात भविष्यांत औद्योगिक वसाहतींचे प्रमाण वाढणार असलेने बॅंकेने औद्योगिकरणासाठी कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे . जिल्हा बॅंक कर्ज पुरवठा करताना ज्या पध्दतीने काळजी घेते त्या पध्दतीने विकास संस्थांनी कर्ज पुरवठा करताना काळजी घ्यावी .बॅंकेने कोअर बॅंकिंग सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे . बॅंकेने मोबाईल बॅंकिंग ऍप विकसीत केले असून याचा लाभ ग्राहकांना लवकरच मिळणार आहे . इंटरनेट बॅंकिंगचे मोठे धोके असून आपण सायबर सिक्‍युरिटीचा विचार केला पाहिजे . राष्ट्रीयकृत बॅंका प्रमाणेच सहकारातील काही बॅंका चांगल्या कामकाज करीत असून यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक कही अग्रेसर आहे
सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हत्याग्रस्त शेतकरी सभासदांचे वारसांना आर्थिक मदत व्हावी म्हणून बॅंक धोरणाप्रमाणे माण तालुक्‍यातील पानवन विकास सेवा सोसायटीचे सभासद कै नामदेव दशरथ नरळे यांचे वारसांस रुपये 1 लाख आर्थिक मदत करणेत आली.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये जलक्रांती केलेल्या माण तालुक्‍यातील टाकेवाडी व भांडवली या गावांना अनुक्रमे प्रथम व दुसरा क्रमांक मिळालेबद्‌दल मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला . शेतकरी सभासदांना बॅंक पीक कर्ज रु .3 लाखापर्यंत शून्य टक्‍के व्याजदराने उपलब्ध करुन देत असलेबद्‌दल तसेच बॅंकेने पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी गावांना रु .1 कोटी 60 हजार इतकी आर्थिक मदत केलेबद्दल गोखळी विकास सेवा सोसा चे डॉ शिवाजीराव गावडे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला व त्यास मासिंगराव जगदाळे यांनी अनुमोदन दिले तसेच याबाबत बॅंकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचा सत्कार केला.

सभेस बॅंकेचे संचालक मा .आ .श्री .शशिकांत शिंदे, मा .श्री .प्रभाकर घार्गे, मा .आ .श्री .बाळासाहेब पाटील, मा .श्री .विक्रमसिंह पाटणकर,मा .श्री .दादाराजे खर्डेकर, मा .श्री .अनिल देसाई, मा .श्री .नितीन पाटील, मा .श्री .दत्तात्रय ढमाळ, मा .श्री .राजेंद्र राजपुरे, मा .श्री .प्रकाश बडेकर, मा .श्री .राजेश पाटील-वाठारकर, मा .श्री .अर्जुनराव खाडे, मा .श्री .प्रदिप विधाते, मा .श्री .वसंतराव मानकुमरे, मा .सौ .सुरेखा पाटील, मा .सौ .कांचन साळुंखे, बॅंकेचे वैधानिक लेखापरीक्षक व कर सल्लागार, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी, व सेवक, वि .का .स .सेवा सोसायटया, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, अर्बन बॅंका, सहकारी पतसंस्था व ग्राहक संस्था, मजूर सोसायटया, पाणीपुरवठा संस्था इत्यादि सहकारी संस्थांचे पदाधिकारी/प्रतिनिधी तसेच व्यक्‍ती सभासद इत्यादि उपस्थित होते
बॅंकेचे उपाध्यक्ष मा .श्री .सुनिल माने यांनी सभेस उपस्थित मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले व सभा संपलेचे जाहीर केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)