सातारा – सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नागरी बँका व ग्रामीण सहकारी पतपेढ्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामभाऊ लेंभे यांनी मोठा विजय मिळवला.
एकूण 374 पैकी 360 मतदान झाले. त्यात सुनील जाधव यांना 47 तर रामराव लेंभे यांना 307 मते मिळाली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागरी बँका व ग्रामीण सहकारी पतपेढ्या मतदारसंघातून राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनेलने रामराव लेंभे यांना उमेदवारी दिली होती. लेंभे यांना यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यामुळे त्यांना मते किती मिळतात, याची औपचारिकता फक्त बाकी होती.
खरंतर अर्ज माघारीच्या दिवशी लेंभे बिनविरोध निवडून आले असते. मात्र, कारणामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील जाधव यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास विलंब झाला.
रामराव लेंभे यांना 307 इतकी मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील जाधव यांना 47 इतकी मते मिळाली आहेत. परिणामी रामभाऊ लेंभे हे 260 मताधिक्य घेऊन विजय झाले आहेत.