मालवून टाक दीप

नवी दिल्ली / मुंबई : रविवारी घरातील दिवे बंद करून मेणबत्ती लावून कोरोनाला पराभूत करण्याचा संकल्प करण्याच्या आवाहनावरून गदारोळ उडाला आहे.राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सार्वांनी एकदम लाईट बंद केल्यास तांत्रिक अडचण निर्मान होऊ शकते,असे सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनी केवळ घरातील विजेचे बल्ब बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी घरातील फॅन, एसी कंप्युटर टीव्ही, फ्रिज बंद करायला सांगितले नाही असे स्पष्टीकरण केंद्रीय उर्जा मंत्रालयाने दिले आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरोधात आणि यात सामिल असणाऱ्या लढाईत सामिल लोकांसोबत एकता दाखवण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे विजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितिन राऊत याबाबत म्हणअले, एकाच वेळी घरातील सर्व वीजेचे दिवे बंद केल्यानंतर मोठीपॉवर ग्रीड बंद पडू शकतात, अशी तांत्रिक अडचण झाली, तर त्याला संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असतील.

नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी, रात्री नऊ वाजता घरातील वीजेचे दिवे बंद घरून, दारात तेलाचे दिवे, मेणबत्ती, मोबाईलचे लाईटस नऊ मिनिटासाठी लावण्याचं आवाहन केलं आहे. पण यावर केंद्रीय उर्जा मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल रोजी, रात्री नऊ वाजता फक्त नऊ मिनिटे वीजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावरील लाईट्‌स, कम्प्युटर, घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, पंखे बंद करायला सांगितलेले नाही. फक्त घरातील वीजेचे दिवे मिनिटे बंद करण्याचे आवाहन केले आहे.

यात हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महापालिका सेवा, उत्पादन सेवा, अत्यावश्‍यक सेवा यांच्यासाठी हे आवाहन नाही. पंतप्रधान यांचं आवाहन फक्त घरांसाठी आहे, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.