सातारा : मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला असतानाच पोलिसांनी आता इव्हिनिंग वॉक करणाऱ्यावरही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी सायंकाळी कोटेश्वर मैदानावर इव्हिनिंग वॉक करणाऱ्या १६ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शाहूपुरी पोलिसांचे एक पथक शनिवारी सायंकाळी शाहूपुरी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना कोटेश्वर मैदानामध्ये काहीजण इव्हिनिंग वॉक करत असल्याचे पोलिसांना दिसले.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन संबंधितांची नावे विचारली. रविंद्र बारटक्के (वय ६०), राजेश कापसे (४९), श्रीरंग शिंदे (७१, सर्व रा. शुक्रवार पेठ, सातारा), सदाशिव शिंदे (वय ६६, रा. प्रतापगंज पेठ, सातारा), संभाजी जाधव, (वय ४५), उमेश लकेरी (५२), शेखर कोल्हापुरे (५५, रा. प्रतापगंज पेठ, सातारा), देवेंद्र झुटिंग (भवानी पेठ,), मनोहर जाधव (५५), दीपक दीक्षित (६०), अस्लम बागवान ( ५५, रा. प्रतापगंज पेठ), आबा पालकर (६१, सदाशिव पेठ), मनिषा लकेरी (४०), वैशाली परदेशी (४०, रा. शुक्रवार पेठ, सातारा) अशी नावे संबंधितांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.