पुणे शहर कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

पालिकेचे सभांसाठीचे शुल्क कमी करण्याची विनंती

 

पुणे : कोपरासभांसाठी महापालिकेकडून प्रत्येक सभेसाठी सुमारे साडे सात हजार रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. हे शुल्क जास्त असल्याने उमेदवारांना परवडणारे नाही तसेच पुण्यासारख्या शहरात सुमारे 200 ते 300 कोपरा सभा घ्यावा लागणार आहेत. पालिकेचे दर पाहता                     या सभांसाठी तब्बल 10 ते 15 लाखांचा खर्च करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन हे शुल्क कमी करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी पुणे शहर कॉंग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदार संघात सुमारे 21 लाख मतदार असून शहराच्या सर्वभागात ते विखूरलेले आहेत. निवडणूक प्रचाराचे दिवस पाहता प्रत्येक उमेदवारा पर्यंत पोहचणे शक्‍य नसल्याने कोपरा संभाचे नियोजन करावे लागते. या मतदारांपर्यंत पोहचायचे झाल्यास सुमारे 200 ते 300 कोपरा सभा घ्याव्या लागणार आहेत. त्यातच, महापालिकेने कोपरासभांना परवानगी देण्यासाठी प्रती सभेस 7 हजार 500 रूपयांचे शुल्क निश्‍चित केले आहे. त्यात जागेच्या भाडयापोटी 4 हजार रूपये तर 1 हजार रूपये स्वच्छता शुल्क आणि 2500 रूपये अनामत रक्कम आहे.                          मात्र, त्यामुळे या सभांसाठी परवानगी घ्यायची झाल्यास उमेदवाराला केवळ त्यावरच 15 लाख रूपये मोजावे लागतील. प्रत्येक उमेदवारास सुमारे 70 लाख रूपये खर्चाची मर्यादा आहे. ही मर्यादा पाहता केवळ सभांवर एवढा खर्च परवडणारा नाही. ही बाब लक्षात घेऊन हे शुल्क कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी शहर कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.