नितीन गडकरी निवडणुकींमध्ये ‘रिजेक्टेड’ ?

नागपूर: नागपुरातल्या चक्क एका उमेदवार यादीत केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारला आहे. नागपुरातील न्यू-इंग्लिश स्कुलमधल्या मतदान केंद्रावर हा प्रकार मतदानाच्या दिवशी घडला.

मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी उमेदवारीची यादी मतदान केंद्राबाहेर लावली जाते. न्यू-इंग्लिश स्कुलच्या बाहेर सुद्धा ही यादी लावण्यात आली होती. मात्र, या यादीमध्ये गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आला होता. हा शिक्का कुणी मारला हे अद्याप समजू शकले नाही

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.