न्हावरे परिसरात शेतामध्ये तळी साचली

न्हावरे -शिरुरच्या पूर्व भागात सायंकाळी मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पूर्व भागातील शेतकरी काही प्रमाणात सुखावला आहे. गेल्या आठ दिवसांत पावसाने दुसऱ्यांदा हजेरी लावली आहे. न्हावरे परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच गोठ्यावरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी गोठ्यांची पडझड झाली. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे.

पूर्व भागात न्हावरे, आंबळे, करडे, आंधळगाव, कुरुळी, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, निर्वी, शिंदोडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. गतवर्षी पावसाने शिरुर तालुक्‍यात चांगलीच दडी मारली होती. त्यामुळे तालुक्‍यातील शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तालुक्‍यात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष भासवू लागले होते. त्यामुळे या पावसाने शेतकरीवर्गात समाधान व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.