10 हजार 112 नवीन बाधित : 9 हजार 843 करोनामुक्त
पुणे – जिल्ह्यात एकीकडे बाधित संख्या दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. तर, दुसरीकडे मृत्यूची संख्याही वाढत असून, गेल्या 24 तासांत तब्बल 99 बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर, 10 हजार 112 नवीन बाधित सापडले आहेत.
या मृत्यूमध्ये पुणे शहरात सर्वाधिक 55 बाधितांच्या मृत्यू झाला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये 25, ग्रामीण भागात 12, कॅन्टोन्मेंट हद्दीत 6, तर नगरपालिका हद्दीत एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
मागील आठ दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यातील करोनाबाधित संख्या मंगळवारी कमी आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील संख्या काहीशी घटली असून, पुण्यात 5 हजार 313, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 1 हजार 838 बाधित सापडले. ग्रामीण, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेट विभाग मिळून 2 हजार 961 बाधित संख्या आहे.
दरम्यान, मंगळवारी करोनामुक्त बाधितांची संख्या 9 हजार 843 इतकी आहे. दिवसभरात 39 हजार 128 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली आहे.