देऊळगावगाड्यात गोठा कोसळला

यवत -सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आज (दि.7) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वळीवाने दौंड तालुक्‍यातील यवत परिसरात हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देऊळगावगाडा येथे मारुती कोकरे यांचा गोठा पडल्याने तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाल्या आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काहींच्या घरावरचे पत्रे उडल्याच्या घटना घडल्या आहेत. विजांच्या कडकडाटासह पावसाने यवत, खामगाव, दहिटणे, भांडगाव, खुटबाव, खोर, देऊळगावगाडा, पिंपळगाव, देलवडी, पारगाव परिसरात तुरळक हजेरी लावली. देऊळगावगाडा परिसरात विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. काही गावांत तुरकळ तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.