चारा छावण्यांना पुन्हा मुदतवाढ!

जिल्ह्यात 30 सप्टेंबरपर्यंत छावण्या सुरू राहणार
पिंपळगाव माळवीची छावणी बंद न करण्याची मागणी

नगर  – जिल्ह्यात ऑगस्ट महिना संपत आलेला असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे चारा व पाण्याची तीव्र टंचाई कायम आहे.त्यामुळे शासनाने नगर जिल्ह्यासह राज्यातील चारा छावण्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पुरेशा पावसाअभावी शासनाला दुसऱ्यांदा छावण्यांना मुदतवाढ द्यावी लागली आहे. यापूर्वी 30 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. जिल्ह्यातील सुमारे 58 हजार जनावरांचा छावणीतच आज पोळा साजरा झाला.


नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी गावामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची छावणी सुरु होती. छावणी प्रशासनाने अजिबात पाऊस पडला नसंताना जमीनीतील ढेकळसुध्दा फुटलेली नसुन ग्रामपंचायत दत्परी 8मिमी पाऊसं असल्याची नोंद असतानाही बंद करणेत आली.

छावणी दि.11 रोजी बंद झाली असून, त्या ठिकाणी अदयापही 55 -60 शेतकऱ्यांचे 270 जनावरे आहेत. कारण जनावरे घरी नेल्यास त्यांना पाणीही उपलब्ध नाही चारा तर दूरची बाब आहे. सदर शेतकऱ्यांच्या जनावरांना आज अखेर अवतार मेहेरबाबाट्रस्ट यांनी चाऱ्यासाठी मदत उपलब्ध करुन दिली आहे. उदयापासुन जनावरांची उपासमार सुरु होणार आहे. तरी या सर्व बाबींचा आपण सहानुभुतीपुर्वक विचार करुन चारा छवणी सुरु करणे बाबत योग्य ती कार्यवाही आपले स्तरावरुन करावी अन्यथा मंगळवार दि.3 सप्टेंबर रोजी आम्ही सर्व शेतकरी आमची सर्व जनावरे तहसील कार्यालयात आणून सोडून देऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

मागील वर्षी नगर जिल्ह्यात पावसाची अत्यंत बिकट परिस्थिती होती. खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले होते. जानेवारी-फे ब्रुवारीपासूनच चारा व पाणीटंचाई निर्माण झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. तो आकडा 504 पर्यंत गेला होता.

जून महिन्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरे घरी नेल्याने 340 छावण्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र पावसाने पुन्हा पाठ फि रवल्याने चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली.त्यामुळे पुन्हा काही तालुक्‍यात चारा छावण्या सुरू झाल्या. पावसाने ऑगस्ट अखेरीसही समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे अद्यापही जिल्हयात 94 छावण्या सुरु असून 51 हजार 812 मोठी व 6 हजार 49 लहान अशी एकूण 57 हजार 861 जनावरे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.