पी.व्ही. सिंधुच्या बायोपिकमध्ये अक्षय साकारणार ‘ही’ भूमिका

भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधुने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जपानच्या नोजोमी ओकुहाराला पराभूत करून इतिहास रचल्यानंतर आता पी. व्ही. सिंधुच्या आयुष्यावर लवकरच बायोपिक बनण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, सिंधुची भुमिका कोणती अभिनेत्री साकारणार यावर शिक्‍कामोर्तब झालेला नसला तरी या सिनेमात बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार हा सिंधुचे कोच पुलेला गोपीचंदच्या भूमिकेत दिसण्याची शक्‍यता आहे. मात्र, अजुनही चित्रपटातील इतर स्टार कास्ट, डायरेक्‍टर कोण असणार याची माहिती मिळालेली नसल्याने या चित्रपटात अक्षय कुमार हा भुमिका साकारणार असल्याची चर्चा पुढे आली आहे.

त्यातच एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पी.व्ही. सिंधुचे प्रशिक्षक पुल्लेला गोपिचंद यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखती दरम्यान त्यांनी पी. व्ही. सिंधू बायोपिकमध्ये त्यांची भूमिका अभिनेता अक्षय कुमारने साकारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. “पी. व्ही. सिंधु बायोपिकमध्ये अक्षय कुमारने माझी भूमिका साकारावी अशी माझी इच्छा आहे. मला अक्षय कुमारचा अभिनय आवडतो आणि अक्षय कुमार ही अशी व्यक्ती आहे ज्याला पाहून लोकांना प्रेरणा मिळते’ असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे या चित्रपटात अक्षयची वर्णी ओलागनार हे निश्‍चित समजले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.