एकादशी दिवशी पालखी सोहळा यवत मुक्‍कामी

उरुळी कांचन – श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा प्रथमच शनिवारी (दि. 29) रोजी सकाळी 11 वाजता कुंजीरवाडी, 12 वाजता सोरतापवाडी, 1 वाजता, उरुळी कांचनला एकादशीच्या दिवशी येणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता पालखी सोहळा यवतकडे रवाना होणार आहे. रस्त्यावरील सर्व भाविकांना फराळाचे वाटप करावे, अशी माहिती पालखी सोहळयाचे विश्‍वस्त माणिकराव मोरे यांनी दिली.

यंदा आषाढी वारीचा सोहळा 334 वा असून सोमवार (दि. 24) रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून प्रस्थान करणार आहे. गुरूवार (दि. 27) रोजी संत तुकाराम महाराज पालखी पुण्यात येणार आहे. शुक्रवार (दि.28) रोजी पुण्यातून लोणी काळभोर येथे मुक्‍कामी येत आहे. दरवर्षी एकादशीच्या दिवशी पालखी सोहळा लोणी काळभोरला मुक्‍कामी येतो. मात्र, यंदा प्रथमच एकादशीच्या दिवशी नायगाव फाटा, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह यवतमध्ये मुक्‍कामी येत आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा उपवास मोडू नये म्हणून भाविकांनी वारकऱ्यांना फराळ पदार्थ वाटप करावे. असे आवाहन संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख काशिनाथ मोरे, अजित मोरे, संजय मोरे यांच्यासह विश्‍वस्तांनी
केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.