लोणी धामणी,(प्रतिनीधी) – धामणी (ता. आंबेगांव) येथे धर्मबिजेला (रविवारी) कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याची लोकवर्गणीतून नवीन करण्यात आलेल्या पितळी पालखीतून वाजतगाजत सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात व फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.
मागील वर्षीच्या (२३ नोव्हेबर २३) सोमवतीच्या सोहळ्यात खंडोबाच्या मानाच्या काठीच्या व पालखीच्या मानकर्यांनी खंडोबाची नवीन पालखी करण्याची ग्रामस्थांना विंनती केलेली होती. त्यावेळी देवस्थानने व सेवेकरी मंडळींनी नवीन पालखी माघ पुनवेच्या यात्रेच्या अगोदर तयार करणार असल्याचे भाविकांना सोमवतीला जाहीर केलेले होते.
माघ महिन्यातील शुक्ल पक्ष द्बितीया धर्मबीजेच्या मूहर्तावर सकाळीच खंडोबा देवस्थानाचे सेवेकरी भगत वाघे वीर मंडळींनी खंडोबाचा मुखवटा पालखीत ठेवल्यानंतर नवीन पालखीची मारुती देऊळाच्या ओट्यावर धामणीच्या सरपंच रेश्मा बोर्हाडे व अजित बोर्हाडे यांच्या हस्ते पूजा करून पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पालखीची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.
धामणी व लोणी येथील पंचरास मंडळीच्या पारंपरिक ताफ्यातील हालगी, ढोलकी, सनई, संबळ, तुतारी व ताशाच्या निनादात मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक सहभागी झालेले होते. पेठेत ठिकठिकाणी महिला भाविकांनी नवीन पालखीची ओवाळणी करून पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर नवीन पालखीसह मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर पालखीची परंपरागत सेवेकरी भगत, तांबे, वाघे व वीर मंडळींनी पारंपरिक पूजा केल्यानतर आरती करण्यात आली.
यावेळी पालखीचे सेवेकरी मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,शांताराम भगत,धोंडीबा भगत,सिताराम जाधव वाघे,दिनेश जाधव,सुरेश पवार, कैलास रोकडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष गजाराम पाटील, देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोर्हाडे, दादाभाऊ भगत, सुभाष तांंबे, प्रा.अशोक पगारिया, ज्ञानेश्वर विधाटे, कोंडीबा तांबे, सुभाष सोनवणे, पहाडदर्याचे सरपंच मच्छिंद्र वाघ,कैलास वाघ, कांतीलाल तांबे, मनोज तांबे,राहूल करंजखेले,अजित बोर्हाडे. माजी सरपंच सागर जाधव, वामन जाधव,उत्तम जाधव,अविनाश बढेकर,विठ्ठल बढेकर,महिपत बढेकर,बाळासाहेब बढेकर,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,गणेश भूमकर, बाळासाहेब विधाटे,रमेश जाधव,सुनील जाधव, अक्षय विधाटे,किसन रोडे, गणपत हरी विधाटे व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.