शेकडो एकर जमिनीवरील फळबागा जमिनदोस्त
सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबीच्या बागा या वादळी वारा आणि पावसामुळे झाल्या अक्षरशः आडव्या झाल्याचे पहायला मिळालत आहे. याशिवाय जिल्ह्यातील शेकडो एकर जमिनीवरील फळबागांसह इतर पिकेही जमिनदोस्त झाली आहेत.
यामध्ये मोहोळ तालुक्यातील राजेश जगताप या शेतकऱ्याची साडेतीन एकराची द्राक्षबाग जमिनदोस्त झाली आहे. यामुळे जगताप यांचे सुमारे 25 ते 26 लाखांचे नुकसान झाले आहे. येत्या आठवडाभरात या बागेत 40 ते 50 टन द्राक्षे, तर 12 टन बेदाणा अपेक्षित होता. त्यातून त्यांना तब्बल 25 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र रात्रीच्या वादळी पावसाने सर्वकाही संपवले. त्यामुळे शासनाने पंचनामे करुन किमान नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.