लग्नाला मुलगाच मिळत नाही- सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हाने अलिकडेच एका कार्यक्रमामधून आपल्या लग्नाविषयीच्या अडचणी सांगितल्या. मी तर लग्नाला तयार आहे, मात्र चांगला मुलगाच मिळत नाही, असे सोनाक्षी म्हणाली. ती ज्या कार्यक्रमात बोलत होती, तो कार्यक्रम तिच्या “कलंक’च्या प्रमोशनसाठी आयोजित केला गेला होता. त्यामुळे तिच्या समवेत वरुण धवन आणि आलिया भट हे देखील होते.

रणबीर आणि आलिया सध्या आपल्या “लव्ह लाईफ’मुळे चर्चेत असतात. तर दुसरीकडे वरुण धवनदेखील आता लवकरच लग्न करणार आहे. तिघांना लग्नाबाबत प्रश्‍न विचारला गेल्यामुळे लग्नाच्या बाबतीत सोनाक्षीच जरा मागे राहिली आहे, असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्या प्रश्‍नावर सोनाक्षीनेही पटकन उत्तर दिले.

अलिया आणि वरुणच्या आगोदर तिला लग्न करायचे आहे. लग्न करून संसार थाटायची तिची देखील ईच्छा आहे. तिला आपल्या योग्यतेचा मुलगा हवा आहे, पण हवा तसा मुलगाच मिळत नाही आहे, असे ती म्हणाली. “नोटबुक’मधील नवोदित हिरो झहीर इक्‍बाल आणि सोनाक्षी यांचे डेटिंग सुरू आहे, अशी मध्यंतरी अफवा पसरली होती. झहीरने इन्स्टाग्रामवर सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र त्यांच्या डेटिंग सुरू असल्याच्या बातमीचे अधिकृतपणे समर्थन कोणीही केलेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.