…अन् ‘चलिए-चलिए’ म्हणत तिथून निसटला अक्षय कुमार

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये सोमवारी देशभरातील नऊ राज्यांतील ७१ जागांसाठीचं मतदान पार पडलं. दरवर्षी निवडणुकीत केवळ सामान्य लोकंच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही उत्साहात बघायला मिळतात. बॉलिवूड सेलिब्रिटीही भारतीय नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही करतात. मात्र यातील काही कलाकार असेही आहेत ज्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ‘अक्षय कुमार’ने सुद्धा आपला मतदानाचा हक्क न बजावल्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

मात्र, सध्या अक्षयचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये अक्षयला एका पत्रकाराने मतदानाविषयी विचारल्यास त्यानं प्रश्नांची उत्तर देण्याचं टाळले व ‘चलिए-चलिए’ असं म्हणत तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अक्षयच्या अशा उत्तरावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अक्षयने काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची मुलाखत देखील होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.