…तर मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत – भाजप नेते 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना भाजप वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. स्वामी यांच्या मतानुसार, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले नाही तर त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगला पर्याय ठरू शकतात. दरम्यान, हा निर्णय निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्वामींनी हे भाष्य केले.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले कि, भाजपने २३० अथवा २२० जागा जिंकल्या आणि एनडीएच्या मित्रपक्षांना ३० जागा मिळाल्या. तर हा आकडा २५० पर्यंत पोहचेल. तरीपण आम्हाला ३० जागांची गरज असेल, असे त्यांनी सांगितले. या स्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील का? या प्रश्नावर स्वामी म्हणाले, हा निर्णय एनडीएमधील इतर मित्रपक्षांवरही अवलंबून असेल. ३० अथवा ४० जागांचे असणारे मित्रपक्ष यांनी समर्थन दिले नाही तर ते (नरेंद्र मोदी) पंतप्रधान बानू शकणार नाहीत. पंतप्रधान मोदींना नितीन गडकरी चांगला पर्याय ठरू शकतील, असेही मत स्वामींनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.