‘फणी’ चक्रिवादळ आंध्रप्रदेशात धडकले; मुसळधार पाऊस सुरु 

नवी दिल्ली – आंध्रप्रदेशमध्ये ‘फणी’ चक्रिवादळ आज धडकले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. फणी चक्रिवादळचा इशारा हवामान विभागाने केवळ आंध्रप्रदेश आणि ओडिशाला दिला होता. परंतु, आता उत्तरप्रदेशमध्येही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

आंध्रप्रदेशच्या समुद्रतटीय जिल्हा श्रीकाकुलमच्या पोदुगुडु गावात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गोदावरी, विशाखापट्टनम आणि विजयनगरममध्येही फणी चक्रिवादळ दाखल झाले आहे. फणी चक्रिवादळामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते.

दरम्यान, हवामान विभागाने २ किंवा ३ मे रोजी फणी चक्रिवादळाचा इशारा दिला होता. या भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी १८०-१९० किमी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ‘एनडीआरएफ’ आणि ‘कोस्टगार्ड’ला याआधीच हायअलर्ट देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.