चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्‍तव्यावर विश्‍वजीत कदम यांचे उत्तर

मुंबई : ‘कॉंग्रेसच्या पाचपैकी एका कार्याध्यक्षाने भाजपमध्ये प्रवेश केला तर आश्‍चर्य वाटायला नको,’ असे म्हणत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्‍तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या दाव्याला खोडून काढत कॉंग्रेस कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘चंद्रकांतदादांचे वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. आताच त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यपदी निवड झाली आहे. ते राज्याचे ज्येष्ठ मंत्रीदेखील आहेत. असं असताना त्यांनी केलेलं हे वक्तव्य केवळ हस्यास्पद आहे,’ अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी आपले पहिले वक्‍तव्य करत कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसमुक्‍म महाराष्ट्र हेच आपल्या कामाचे पहिले ध्येय असल्याचेही पाटील यांनी म्हटले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)