स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर – श्रीरामपूर तालुक्यात रात्रीच्यावेळी कपड्याचे दुकान फोडणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्यांच्या कडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सोमनाथ ज्ञानेश्वर कासार,(वय-25, रा रांजणगाव ता. राहता) यास ताब्यात घेतले. हा गुन्हा त्याचा मित्र विठ्ठल सावळेराम पवार, (रा. समाजमंदिर, रांजणगाव, ता. राहता) यांनी मिळून केला असल्याचे सांगितले. विठ्ठल पवार याचा शोध घेतला असता तो मात्र, मिळून आला नाही.
आरोपीस मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, कमलेश पाथरुट, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, सागर ससाणे यांच्या पथकाने कारवाई केली.