नगर – भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत शुभम संभाजी ससे याने घवघवीत यश संपादन करुन, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए) खडकवासला (पुणे) येथे 134 व्या तुकडीत तीन वर्षं व एक वर्षं डेहराडून येथे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. चार वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष सैन्यदलात लेफ्टनंट पदावर देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
शुभम ससे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सैनिकी स्कुलला झाल्याने सैन्यदलात अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. आत्मविश्वास, परिश्रम, शिस्त, धाडस, चिकाटीच्या जोरावर सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली आहे. शुभमच्या या संपूर्ण यशामागे सर्वांत महत्त्वाचा वाटा हा आई आणि वडिलांचा आहे. सुभेदार संभाजी भानुदास ससे यांचा मुलगा असून, त्यांनी सैन्यदलात 25 वर्षें सेवा बजावली आहे. रोहिदास कराळे, आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे व मेजर नवनाथ कराळे यांचा भाचा आहे.