#IPL2019 : हैदराबाद-कोलकाताचा सामना रंगणार

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टोवर फलंदाजीची मदार

सनरायजर्स हैदराबाद Vs कोलकाता नाईट रायडर्स

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ – राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद

हैदराबाद – गत सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या दोनवेळच्या विजेता कोलकाता नाईट रायडर्सला रविवारी होणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात वापसी करावी लागणार आहे. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल मैदानावर रंगणार आहे. गुणतालिकेत दोन्ही संघांचे प्रत्येकी 8-8 गुण असून हैदराबाद आपली विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाताला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

आयपीएलच्या बाराव्या सत्रात नऊ सामन्यांत चार विजय आणि पाच पराभवामुळे 8 गुणांसह कोलकाता सहाव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे हैदराबादने आठ सामन्यात चार विजय नोंदवित 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने घरच्या मैदानावर झालेल्या मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 6 गडी राखून पराभव करत पुन्हा विजयी लय मिळविली आहे.

आता कोलकाताविरुद्धही ही लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. चेन्नईसोबत झालेल्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले होते. संघाने प्रथम गोलंदाजी करत नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईला 5 बाद 132 धावांवर रोखले होते. हे आव्हान चार गडी मोबदल्यात सहज पार केले.

लेग स्पिनर राशिदने 4 षटकांत नाममात्र 17 धावांत दोन विकेट घेतल्या. आता कोलकातविरुद्धच्या सामन्यातही हैदराबादला राशिदकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांच्यावर फलंदाजीची मदार असणार आहे. या दोघांनी चेन्नईविरुद्ध 66 धावांची दमदार सलामी दिली होती.

दुसरीकडे बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर कोलकाताला हैदराबादविरुद्ध विजय मिळविणे आवश्‍यक आहे. बंगळुरूने दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या आंद्रे रसेल (25 चेंडूत 65 धावा) आणि नितेश राणा (46 चेंडूत नाबाद 85 धावा) यांनी आक्रमक खेळी करत संघाला विजयासमीप नेले होते. या सामन्यातही संघाला त्यांच्याकडून अशाच खेळाची आशा आहे.

विश्‍वचषक टी-20 स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला दिनेश कार्तिक अद्याप चांगली खेळी करू शकलेला नाही. दरम्यान, या सत्रातील दोन्ही संघातील पहिल्या लढतीत कोलकाताने रसेलच्या 19 चेंडूत 49 धावांच्या मदतीने 6 गड्यांनी विजय मिळविला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)