ऍमेझॉनला चीनमध्ये करावा लागला अपयशाचा सामना

शांघाय – चीनमध्ये ई-कॉमर्स बाजारात ऍमेझॉन आपला व्यवसाय विस्तार करण्यासह विशेष जागा बनविण्यात अपयशी ठरली आहे. ऍमेझॉनला अलीबाबा आणि जेडी डॉट कॉम यांच्यासोबत स्पर्धेला तोंड देताना अपयश आले आहे. त्यामुळे या कंपनीने या देशातून पाय काढता घेण्याचे ठरविले आहे.

ऍमेझॉनने 2004 मध्ये ऑनलाईन पुस्तक विक्रीला सुरुवात करत आणि जोयोसोबत भागीदारी केल्यावर त्यांनी चीनच्या बाजारात प्रथम प्रवेश केला होता; परंतु त्यात फारसे यश मिळविण्यात कंपनीला यश आले नाही. 2018 च्या चौथ्या तिमाहीत ऑनलाईन किरकोळ बाजारात ऍमेझॉनचा शेअर फक्‍त 0.6 टक्‍के होता. त्यामुळे ऍमेझॉन कंपनीने येत्या 18 जुलैपासून आपला ई-कॉमर्सचा व्यवसाय बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.

चीनमधील ग्राहकांना कंपनीकडून सेवा बंद केली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. ऍमेझॉन आपल्या अन्य प्रकारच्या सेवा मात्र सुरू ठेवणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ऍमेझॉन चीनमध्ये वेब सर्व्हिसेस, किंडल ई-बुक्‍स आणि क्रॉस बॉर्डर पथक असणाऱ्य़ा सेवा मात्र कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.