KKR vs SRH : आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चार धावांनी विजय मिळवला. शनिवारी झालेल्या सामन्यात संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 20 षटकांत 9 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात पॅट कमिन्सच्या संघाला 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा करता आल्या. कोलकाताने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. आता संघाचा सामना २९ मार्चला बेंगळुरूमध्ये आरसीबीशी होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २०९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद मैदानात उतरली. मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्माने सनरायझर्सच्या डावाची सुरुवात केली. विकेट्स न देता दोघांनी संयमी बॅटिंग करत पहिल्या पाच ओव्हर्समध्ये ५८ रन्स बोर्डावर लावले.मात्र त्यानंतर एकाही बॅट्समनला मैदानावर चांगली खेळी करता न आल्याने सनरायझर्सचा डाव गडगडला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सहाव्या ओव्हरमध्ये हर्षतने अग्रवालला ३२ (२१) आउट करत केकेआरला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. सहा ओव्हर्सनंतर सनरायझर्सने बोर्डावर ६५ रन्स लावले होते. आंद्रे रसलने केकेआरला दुसरा झटका देत अभिषेक शर्माला तंबूत ३२ (१९) पाठवले.
त्यानंतर मैदानात असलेल्या त्रिपाठी आणि माक्रमने संयमी खेळी करत १० ओव्हर्समध्ये टीमचा स्कोअर शंभरी पार पोहचवला. मात्र 107 धावांवर सनरायझर्सला तिसरा धक्का बसला. एडन माक्रम 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्याला वरुण चक्रवर्तीने सुनील नरेनच्या हाती झेलबाद केले.
सुनील नरेनने राहुल त्रिपाठीला हर्षित राणाकरवी झेलबाद करत हैदराबादला १३ व्या षटकात १११ रन्सवर चौथा धक्का दिला. त्याला अवघ्या २० धावा करता आल्या. त्यानंतर क्लासेनने एक बाजू लावून धरत चांगली खेळी करत दमदार फिफ्टी ५५ (२५) पूर्ण केली.
हेनरिक क्लासेनने SRH साठी जोरदार पुनरागमन केले आहे. हैदराबादला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 13 धावांची गरज होती.मात्र क्लासेन बाद होताच टीम डगमगली.
केकेआर आणि एसआरएच यांच्यात खेळला जाणारा सामना खूपच रोमांचक झाला. SRH ला एका चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज होती मात्र ते अपयशी ठरले आणि केकेआरने विजयावर शिक्कामोर्तब केले.
आंद्रे रसलने बॅटिंगप्रमाणे बॉलिंगमध्ये चमक दाखवत २ विकेटस घेतल्या.
रसल-रिंकूच्या फटकेबाजीमुळे केकेआरने उभा केला धावांचा डोंगर
केकेआरच्या आंद्रे रसलने मारकांडेला एकाच ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावत दमदार फटकेबाजी केली. रिंकू सिंगने देखील रसलला चांगली साथ देत फटकेबाजी केली. दोघांनी मिळून २४ बॉल्समध्ये ५० रान्सची भागीदारी पूर्ण केली. रसलने अवघ्या २० बॉल्समध्ये आपली फिफ्टी पूर्ण करत टीमला मजबूत स्थितीत नेले.अखेरच्या ओव्हरमध्ये नटराजनने रिंकूला आउट करत ही जोडी फोडली.
रसल रिंकूने केलेल्या फटकेबाजीमुळे केकेआरला शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये ८५ रन्स मिळाले. रसलने केलेल्या ६४ (२५) रन्सच्या जोरावर केकेआरने २० ओव्हर्समध्ये सनरायझर्ससमोर २०८ रन्सचा डोंगर उभा केला आहे. सनरायझर्सकडून नटराजनने सर्वाधिक ३ तर मर्कंडेने २ विकेट्स घेतल्या.