कृष्णा बोराने विजेतेपद पटकाविले

पुणे – निखिल कानेटकर बॅडमिंटन अकादमीचा खेळाडू कृष्णा बोराने निकोसिआ येथे होत असलेल्या सायप्रस युथ इंटरनॅशनल स्पर्धेत दुसऱ्या मानांकित निकोलस कोकोसीसचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. कृष्णाला या स्पर्धेत पहिले मानांकन देण्यात आले होते.

पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील सामने एकतर्फीजिंकल्यावर त्याला उपांत्यफेरीत चौथ्या मानांकित ख्रिस्तोफर गॉर्जिओने विजयासाठी चांगलेच झगडवले. या सामन्यात कृशाने पहिला सेट 20-22 असा गमावल्याने स्पर्धेबाहेर फेकला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु, त्याने पुढील दोन सेट 21-14, 21- 18 असे जिंकत सामना आपल्या बाजूने झुकवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्याने यजमान देशाच्या कोकोसीसचा 21-12, 21- 16 असा सहज पराभव करत या स्पर्धेचे आपले पहिले विजेतेपद पटकाविले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)