पुणे – स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा तर्फे आयोजीत सातव्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत गालाघर, वेंकीज् व एम्प्टोरीज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत गणेश प्रजापतीच्या 38 धावांच्या बळावर गालाघर संघाने जीएस महानगर संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अनिल बेलोटेच्या 42 धावांसह जीएस महानगर संघाने 9 षटकांत 5 बाद 73 धावा केल्या. 74 धावांचे लक्ष गालाघर संघाने 8.6 षटकांत 4 बाद 76 धावा करून पूर्ण केले.
दुसऱ्या लढतीत प्रविण पाटीलच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एम्प्टोरीज संघाने आय प्लेस इंडिया संघाचा 50 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना निखिल लोंढेच्या 31 व अजय निकमच्या 23 धावांसह एम्प्टोरीज संघाने 9 षटकांत 4 बाद 56 धावा केल्या. निर्धारित धावांचा पाठलाग करताना प्रविण पाटील व निखिल लोंढे यांच्या भेदक गोलंदाजीपुढे आय प्लेस इंडिया संघाचा डाव केवळ 7.4 षटकात सर्वबाद अवघ्या 6 धावांत अटोपला. अन्य लढतीत अमित सिंगच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेंकीज् संघाने ऍमडॉक्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला.
उप-उपांत्यपूर्व फेरी
जीएस महानगर – 9 षटकांत 5 बाद 73 (अनिल बेलोटे 42, अतूल दागडे-पाटील 32, शुभेंदू पांडे 1-11). गालाघर- 8.6 षटकात 4 बाद 76 (गणेश प्रजापती 38, अक्षय पाटील 2-28) सामनावीर- गणेश प्रजापती.
एम्प्टोरीज – 9 षटकात 4 बाद 56 (निखिल लोंढे 31, अजय निकम 23, विनित पीर 2-27). आय प्लेस इंडिया – 7.4 षटकात सर्वबाद 6 (प्रविण पाटील 3-6, निखिल लोंढे 2-9) सामनावीर- प्रविण पाटील.
ऍमडॉक्स – 9 षटकात 5 बाद 40 (अलोक पाटील 28, मयुर टिंग्रे 2-14). वेंकीज्- 4.1 षटकात 2 बाद 46 (अमित सिंग 35, गौरव कुमार 2-19) सामनावीर- अमित सिंग.