राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांनी बांधले शिवबंधन

मुुंबई (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणूक तोडांवर असतानाच शहापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडले. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

पांडुरंग बरोरा यांच्याबरोबरच पालघरमधील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष तसेच अन्य कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.

कुटुंबात कॉंग्रेसचे वातावरण असले तरी लहानपणापासून बाळासाहेबांच्या भाषणांतून प्रेरणा मिळत होती. शिवसेना ही काम करणारी संघटना असल्याने शहापूरवासीयांचे प्रश्न घेऊन या पक्षात प्रवेश करीत आहे, असे आमदार बरोरा म्हणाले. शहापूरमधील 287 गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो. येथे एमआयडीसी होऊन तेथील तरुणांना रोजगार मिळविण्याचा प्रश्ना असो की येथे प्रशासकीय भवन, क्रीडा संकुल निर्मितीचा विषय हे शिवसेनेमुळे नक्कीच मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)