लंडन – शेकडो प्रवाशांची माहिती चोरीला गेल्याप्रकरणी ब्रिटनच्या माहिती आयुक्तांनी ब्रिटिश एअरवेजला 18 कोटी 30 लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. ब्रिटिश एअरवेजच्या 2017 मधील एकूण व्यवसायाच्या 1.5 टक्के हा दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या वर्षी ब्रिटिश एअरवेजच्या वेबसाइटवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये प्रवाशांच्या माहितीची चोरी करण्यात आली होती. या चोरी प्रकरणीचा तपास करूनही कोणतेही धागेदोरे मिळाले नसल्याचे कंपनीने म्हटले होते. दंड ठोठावल्यानंतर ब्रिटिश एअरवेजचे सीईओ अलेक्स क्रुझ म्हणाले, आम्ही या प्रकरणी वरिष्ठ आयोगाकडे अपील करणार आहोत.