हिवाळ्यात पिकला आंबा

ऐन थंडीत झाडांवर मोठ्या प्रमाणात कैऱ्या

पिंपरी : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आंब्याच्या झाडाला मोहोर येतो आणि साधारण मार्च महिन्याच्या सुमारास कैऱ्या दिसू लागतात. उन्हाळ्यात आवडीने खाल्ला जाणारा फळांचा राजा यावर्षी ऐन थंडीत दिसू लागला आहे. निसर्ग नियमानुसार आंब्याचा मोहर वसंत ऋतूत येतो व होळीच्या सणानंतरच आंब्याच्या कैऱ्या पहावयास मिळतात. बदलत्या हवामानामुळे पिंपरी चिंचवडच्या नैसर्गिक वृक्ष वाढीच्या चक्रामध्ये बदल पहावयास मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवनानागर – बिजलीनगर रोड, एमएसईबी कॉलनी, हनुमान मंदिर परिसर चिंचवड तसेच जुनी सांगवी या परिसरात मोठ-मोठ्या कैऱ्या दिसत आहेत. काही कैऱ्यांना गुलाबी रंग चढत असून पिकायला लागल्याप्रमाणे दिसू लागल्या आहेत. सांगवी येथील काही मोजक्‍या वृक्षांना नोव्हेंबरच्या सुमारासच लहान-लहान कैऱ्या दिसू लागल्या होत्या.

या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचा एक अभ्यास गट त्यामध्ये विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विजय जगताप, सतीश देशमुख, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे, अमोल कानु, अजय घाडी, नितीन मांडवे तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील हे आपल्या शहरातील हिवाळी वृक्ष संपदा ह्या विषयासंदर्भात निरीक्षण करीत आहे. हे परीक्षण करीत असताना आंब्याचे झाड निदर्शनास आले.

महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व हवामानाचा विचार केला असता हिवाळ्यामध्ये ते पण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये कैऱ्या येणे ही फारच दुर्मिळ घटना भासत आहे. या अगोदर ह्याच वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात दिवाळीच्या सुमारास नांदेड येथील हिमायतनगर येथील टेंभी रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळील आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात नाशिक-येवला येथील राजापूर मधील शेतकऱ्याच्या झाडाला हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात कैऱ्या लागल्याचा उल्लेख आढळतो. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये कोठेही कैऱ्या लागल्याचा संदर्भ आढळून येत नाही. या सगळ्यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहराने आश्‍चर्यकारक घटनेची नोंद केली आहे.

याबाबत पर्यावरण अभ्यासक प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, जुन्या पिढीतील शेतकरी तसेच याबाबत माहिती असणाऱ्या लोकांशी याबाबत चर्चा केली असता, वातावरणातील एवढा मोठा बदल धोक्‍याची घंटा असू शकते. यावर्षी थंडी सुरू होण्यास देखील खूप उशीर झाला आहे.

नाशिक, नांदेड तसेच पिंपरी चिंचवड शहरातील हिवाळी आंब्याचे दर्शन म्हणजे वातावरण बदलाचे संकेतच आहेत. हरित पट्टा कमी झाल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. वाढत्या शहरीकरणाचा तसेच विकासकामांचा फटका वृक्षांना बसत आहे. वृक्ष लागवड मोठ्या संख्येने शहरात करणे आवश्‍यक आहे. निसर्गाने दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करता कामा नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)