पिंपरी – जाणिवपूर्वक विविध कारणांनी त्रास देवून विवाहितेला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी पिडीत महिलेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन येथील रामनगर कॉलनी परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी 35 वर्षीय पिडीत महिलेने हिजंवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरुन, तिचा पती अमेय रविंद्र मडकईकर, सासू नमिता रविंद्र मडकईकर, सासरे रविंद्र मडकईकर (सर्व रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत महिलेचा विवाह झाल्यानंतर 2016 सालापासून तिचा पती, सासू व सासऱ्यांनी संगणमत करुन वेगवेगळ्या कारणावरुन तिला क्रुर वागणूक देत शारिरिक व मानसिक त्रास दिला. तसेच तिला शिवीगाळ करुन बॅटने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर तिचे सासरे रविंद्र यांनी कारच्या ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम फॉर्मवर खोट्या सह्या घेतल्या.