पिंपरी -भर उन्हात कलिंगडाचा आस्वाद घेता- घेता कविता सादर करायची, या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित गारेगार कवी संमेलन शब्दधन काव्यमंचाच्या वतीने दापोडी येथे रंगणार आहे.
दापोडी-पिंपळेगुरव रस्त्यावर काटे पेट्रोल पंपाशेजारी 26 तारखेला दुपारी दीड वाजता हे कवी संमेलन होणार आहे. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवियित्री वर्षा बालगोपाल असणार आहेत.