भारतातील निवडणूक प्रक्रिया आदर्श घेण्यासारखी – हरिंदर सिध्दू

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजनैतिक अधिकारी हरिंदर सिध्दू यांनी ईव्हीएमच्या प्रणालीची प्रशंसा केली आहे. त्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रिया ही प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

भारतातील निवडणुकीचा अनुभव हा फार प्रेरणादायी होता. निवडणूक आयोगाने व अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे सर्व व्यवस्थित हाताळले आहे त्यामुळे भरपूर लोक मतदानासाठी बाहेर पडली आहेत. ही एक चांगली व सुव्यवस्थित सेवा आहे. ईव्हीएम मशीन बघून मी खूप प्रभावित झाले आहे. ईव्हीएमला जोडलेली व्हीव्हीपॅट प्रणाली देखील खूप चांगली आहे. आमच्या ऑस्ट्रेलियात या मशीन नाहीत. बॅलोट पेपर प्रणाली जी आम्ही ऑस्ट्रेलियात वापरतो ती याच्यासारखी सुव्यवस्थित नाही. त्यामुळे त्याच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात, असे सिध्दू यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.