पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी – माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये, म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे घडली. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुहास रामदास हुले (वय-30 रा. बोरडेवाडी, मोशी) व रामदास हुले (वय-64) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे 2016 साली लग्न झाल्यापासून आरोपींनी माहेरहून 5 लाख रुपये घेवून ये म्हणून विवाहितेला सतत शिवीगाळ व मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)