पिंपरी – रागाने पाहिल्याचा समज करुन घेत दोघांनी मिळून तरुणाच्या तोंडावर दगडाने मारुन जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.19) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. अमोल गंगाराम सोनवणे (वय-21, रा. आनंदनगर, चिंचवड) असे मारहाणीत जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन, “ससा’ उर्फ सुरज वाघमारे व स्वप्निल माडेकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल आपल्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी जात असताना आरोपीने माझ्याकडे का पाहतोस? असे म्हणून अमोल याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व तोंडावर दगडाने मारुन गंभीर जखमी केले. या भांडणात अमोल यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठी व मोबाईल गहाळ झाला आहे.