विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा

पिंपरी – विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यासह नणंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सत्यनारायण गणपती मोटुरु (वय-34), गणपती मोटुरु (वय-68), सत्यवती गणपती मोटुरु (वय-59) व हेमलता राजशेखर (वय-40) यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला तिच्या पतीने किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करीत घरातून बाहेर हो, अशी धमकी देऊन घराबाहेर काढले. तसेच तिच्या सासू-सासऱ्यांनी तिला तुला स्वंयपाक येत नाही म्हणून शिवीगाळ केली तर नंनद राजशेखर यांनी तू माहेरहून कपडे, दागिने व दीड लाख रुपये घेवून ये म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here