शिक्षण समितीला ‘तहकुबी’चे ग्रहण

पिंपरी – एकीकडे नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असतानाच शिक्षणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षण समितीच्या सलग सहा सभा तहकूब करण्यात आल्या. आचारसंहिता संपल्यानंतर तहकूब झालेल्या दोन्ही तहकूब सभांचा यात समावेश आहे. त्यामुळे एकीकडे शैक्षणिक साहित्यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याच्या निर्णयाबाबत संभ्रम असतानाच, शिक्षण समितीच्या लागोपाठ सहा सभा तहकूब झाल्याने पालिका वर्तळात याचीच चर्चा सुरु आहे.

आचारसंहिता संपल्यानंतर सर्वच विषय समित्यांचे कामकाज हळुहळू रुळावर येऊ लागले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आतापर्यंत पालिकेच्या एकूण तीन सभा पार पडल्या. शिक्षण समितीच्या पाक्षिक सभांचे वेळापत्रक असल्याने, महिनाभरात या समितीच्या दोन सभा पार पडतात.

18 एप्रिलपासून या समितीची एकही सभा होऊ शकली नाही. आतापर्यंत 18 एप्रिल, 2 मे, 7 मे, 16 मे 6 जून आणि 20 जूनच्या एकूण सहा सभा तहकूब झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक घडामोडींबाबत महापालिका आयुक्‍तांनाच निर्णय घ्यावा
लागत आहे.

गुरुवारची सभा महासभेमुळे तहकूब

शिक्षण समितीची 6 जूनची तहकूब सभा 20 जूनला आयोजित करण्यात आली होती. मात्र यादिवशी महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे अन्य कोणत्याही समितीची नियोजित सभा असल्यास ती तहकूब केली जाते. त्याकरिता समितीचे सभापती महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळे शिक्षण समितीची 20 जूनची तहकूब सभा आता 4 जुलैला आयोजित करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.