पालिकेच्या दोन उपअभियंत्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश

पिंपरी – नेमून दिलेल्या कामकाजात दिरंगाई केल्याप्रकरणी दोन उपअभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. अमृत व जेएनएनएयूआरएमअंतर्गत कामकाजात दिरंगाई करणारे विजय जाधव आणि सुनिलदत्त नरोटे या स्थापत्य विभागातील दोन उपअभियंत्यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने हरित स्थळे विकसित करण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही उपअभियंत्यांकडे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जेएनएनयूआरएम आणि अमृत अभियानाअंतर्गत उद्यान व ग्रीन स्पेसेस प्रकल्पाच्या कामामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा आणि दिरंगाई झाल्याची बाब निदर्शनास आली.
उपअभियंता विजय जाधव यांनी सीडीसी प्लॉट येथे वृक्षारोपण करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केलेले दिसून येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्या ठिकाणी या प्लॉटचे समतलीकरण किंवा सपाटीकरण करण्याचे कामकाज “फ’ क्षेत्रीय स्थापत्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर लावलेली झाडे पुन्हा परस्पर काढण्यात आली आहेत. उपअभियंता सुनीलदत्त नरोटे यांनी कामकाजाचा कार्यारंभ आदेश देण्यापूवी आरक्षित जागेचा संपूर्ण ताबा आणि त्यावर असणारी अतिक्रमणे, प्रत्यक्षात उपलब्ध असलेली जागा याबाबत प्रकल्प सुरू होण्यापूर्वी विचार केलेला नाही. साईटवरील जागा ताब्यात घेण्यासाठी आणि अतिक्रमणे काढण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाही. कामाची मुदत 25 सप्टेंबर 2018 पर्यंत असताना 31 मार्च 2019 पर्यंत विलंबाने काम पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)