कमी अपेक्षा असल्याने स्वतःला सिद्ध करण्याची संधी – हनुमा विहारी

नवी दिल्ली – भारतीय राष्ट्रीय संघासाठी पदार्पणाच्या सामन्यात केलेला सर्वसाधारण खेळ आणि टी- 20 क्रिकेटसाठी त्याचा नैसर्गीक खेळ जास्त उपयुक्त ठरत नसल्याने हनूमा विहारीकडून टी- 20 मध्ये जास्त अपेक्षा ठेवल्या जात नाही. हीच बाब फायद्याची असल्याचे सांगताना स्वतःला सिद्ध कारण्याची संधी असल्याचे हनुमा विहारीने पीटीआयशी बोलताना म्हटले आहे.
विहारीला मागील तीन वर्षे आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघाने करारबद्ध करण्यास पुढाकार घेतला नाही. त्यामुळे तो तीन वर्षे अनसोल्ड राहिला होता; परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयश अय्यर आणि रिषभ पंतसारख्या स्टार खेळाडूंचा भरणा असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने करारबद्ध केले आहे. आयपीलचा नवीन हंगाम 23 मार्चपासून सुरू होणार आहे.

विहारी म्हणाला, मागील काही वर्षात मी कमी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. त्यामुळे लोकांच्या माझ्याकडून जास्त अपेक्षा नाहीत. खरे सांगायचे झाले तर ही बाब माझ्यासाठी चांगली असून याचा मी साकारात्मकतेने विचार करत आहे. यामुळे मला स्वतःला सिद्ध करण्याचे दडपण नाही. मी माझा नैसर्गीक खेळ करत संघाच्या विजयात हातभार लावू शकतो.
दिल्ली कॅपिटल्समध्ये चांगल्या भारतीय खेळाडूंची भरणा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातच काही विदेशी खेळाडूंचे संघातील स्थानही निश्‍चित आहे. त्यामुळे विहिरीला अंतिम संघात स्थान मिळेल की नाही याची शंका आहे. परंतु, कोणत्याही क्रमांकावर फलंदाज करण्याची क्षमता असल्याने तो संघात स्थान मिळवण्यासाठी स्वतःला सक्षम समजतो. याबाबत विहारी म्हणाला, मी काही वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन ज्या क्रमांकावर मला खेळण्यास सांगेन मी तेथे मी फलंदाजी करण्यास तयार आहे. सलामी, मधलीफळी किंवा फिनिशरच्या भुमीकेतेही खेळण्यची माझी तयारी आहे. कोणताही एक क्रमांक माझा अवडता क्रमांक नाही.

रणजी विजेत्या विदर्भ संघाविरुद्ध इराणी चषकात दोन्ही डावात शतक झळकावण्याचा पराक्रम केल्याबाबत विचारले असताना तो म्हणाला, विदेशात खेळणे आणि भारतात खेळणे यात खूप फरक आहे. ईराणी चषकात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारे होती. तरी मी सलग डावात शतके करू शकल्याचे समाधान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)