वाराणसी – लोकसभा निवडणुकीत मिळलेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले असून धन्यवाद रॅली काढण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. नरेंद्र मोदी यावेळी बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचं दर्शन घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरभर सजावट करण्यात आली असून, फुलांचा वर्षाव होणार आहे.
Varanasi: More visuals from Kashi Vishwanath temple as PM Narendra Modi offers prayers. pic.twitter.com/3RFDhPzIVp
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 27, 2019
#WATCH Varanasi: Crowd breaks into chants of 'Modi Modi' as the convoy of PM Modi moves through streets of Varanasi to Kashi Vishwanath temple. pic.twitter.com/YW0t5dkQPP
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 27, 2019
#WATCH: Artists perform in Varanasi ahead of PM Narendra Modi's visit to the city today. pic.twitter.com/DyBWMudFEi
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 27, 2019
नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी येत्या गुरुवारी (30 मे) रोजी होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभामध्ये मोदी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमवेत सलग दुसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. भाजपने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्षाचा दर्जा मिळवला