मुंबईचे राजे संघाचा पॉंडिचेरी प्रिडेटर्सवर विजय

पुणे – मुंबईचे राजे संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतील मैसूर येथे सुरू असलेल्या सत्रात पॉंडिचेरी प्रिडेटर्स संघाला 33-30 अशा फरकाने पराभूत केले. मैसूरच्या चामुंडी विहार स्टेडियम येथे हे सुरू आहेत.

मुंबई चे राजे व पॉंडिचेरी प्रिडेटर्स हे संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर होते. त्यामुळे पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघ 6-6 असे बरोबरीत होते. मुंबईच्या संघाने दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये सलग चार गुणांची कमाई करत संघांसाठी 10-6 अशी आघाडी घेतली. यानंतर मुंबईच्या महेशने गुणांची कमाई करत संघाची आघाडी 14-7 अशी केली व सहा मिनिटापूर्वी आघाडी घेतली.

पॉंडिचेरी प्रिडेटर्सने पाच गुणांची कमाई केली. पण, दुसऱ्या क्वॉर्टरअखेरीस मुंबईकडे 16-12 अशी आघाडी होती. तिसऱ्या क्वॉर्टरअखेरीस दोन्ही संघांकडून डु ऑर डाय रेडमध्ये गुण मिळवण्यावर भर होता.मुंबई चे राजे संघाने आक्रमक खेळ करत दोन मिनिटांपूर्वी 20-16 अशी आघाडी घेतली. शेवटच्या मिनिटाला पॉंडिचेरी संघाने तीन गुणांची कमाई केली. पण, तिसऱ्या क्वार्टरमध्ये मुंबई चे राजे संघाकडे 23-19 अशी आघाडी होती.

मुंबईच्या संघाने शेवटच्या क्वार्टरमध्ये मनवीराने दोन गुण मिळवत प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करत आठ गुणांची कमाई केली व 28-20 अशी आघाडी घेतली.यानंतर पॉंडिचेरी संघाच्या चढाईपटूंनी सलग चार गुण मिळवले पण, मुंबई चे राजे संघाने दोन मिनिटांपूर्वी 31-25 अशी आघाडी घेतली.पॉंडिचेरी संघाने मुंबईला सर्वबाद केले पण, तरीही मुंबईच्या संघाने सामना 33-30 असा जिंकला. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)