हॉल ऑफ फेम एटीपी टेनिस स्पर्धेत पेसची आगेकूच

न्यूपोर्ट, दि.20-भारताच्या लिएंडर पेस याने न्यूझीलंडच्या मार्कोस डॅनियलच्या साथीत हॉल ऑफ फेम एटीपी टेनिस स्पर्धेतील दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. त्यांनी मॅथ्यु एब्डेन व रॉबर्ट लिंडस्टेड यांचा 6-4, 5-7, 14-12 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला.

पेस या 45 वर्षीय खेळाडूने पासिंग शॉट्‌सचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने वेगवान व बिनतोड सर्व्हिसही केल्या. डॅनियलनेही जमिनीलगत परतीचे फटके व नेटजवळून प्लेसिंग असा चतुरस्त्र खेळ करीत त्याला चांगली साथ दिली. 2006 मध्ये जॉन मॅकेन्‍रोने सॅन होजे एटीपी स्पर्धेत वयाच्या 47 व्या वर्षी भाग घेतला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)