धारणा आणि आर्या यांना विजेतेपद

पुणे – दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग ऍकॅडमीतर्फे आयोजित अश्‍वारोहण स्पर्धेत मुख्य शो जंपिंग प्रकारात धारणा चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर पोल बेंडिंग प्रकारात मोहम्मद सय्यद, विहान काळोखे, आर्या ठाकूर हे आपापल्या गटात अव्वल ठरले. पुणे, पिंपरी-चिंचवड येथून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

शो जपिंग या खुल्या गटात झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक धारणा चौधरी (34.59 से.), दिशांत मेहता (36.67 से.) द्वितीय तर श्रेया श्रीखंडे (1 मि.04.56 से.) ने तृतीय क्रमांक मिळविला. तर ड्रसाज प्रकारात धारणा चौधरी, श्रेया श्रीखंडे, सोफिया बैग यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले.

पोल बेंडिंग 10 ते 12 वयोगटात प्रथम मोहम्मद सय्यद, द्वितीय मिहीर जोशी तर मनवीथ कुमार याने तृतीय क्रमांक पटकाविला. तर 12 ते 18 वर्षे वयोगटात विहान काळोखे (प्रथम), शाल्मली मंडलिक (द्वितीय), रुहान अग्रवाल (तृतीय) क्रमांक मिळवला. खुल्या गटात आर्या ठाकूर, रितेश अग्रवाल, दिशांत मेहता यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे आयोजन प्रतिष्ठानचे गुणेश पुरंदरे आणि विनायक हळबे यांनी केले होते.

शिवसृष्टी, कात्रज-आंबेगाव येथे आयोजित एकदिवसीय स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. ए. अडगुलवार, उद्योजक जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे यंदा 19 वे वर्ष होते. उद्‌घाटनप्रसंगी उद्योजक बाबासाहेब शिंदे उपस्थित होते. यावेळी शो जम्पिंगची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)