बिग बॉस फेम मंदाना करीमी हिने “कोका कोला’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात ती नेगेटिव्ह रोल करणार असून तिच्यासोत सनी लियोनी झळकणार आहे. प्रसाद ततिकेनी हे दिग्दर्शन करणार असून सनी लियोनी मुख्य भूमिका साकारणार आहे. मंदाना सुमारे दिड वर्षानंतर मोठया पडद्यावर पुन्हा पर्दापण करत असून या चित्रपटाबाबत ती खूप उत्साहित दिसते.
मंदाना म्हणाली, अनेक ऑडिशन दिल्यानंतर हा चित्रपट मला मिळाला आहे. गेल्या दिड वर्षात मी कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. महेंद्र धारीवाल आणि परमदीप सिंह संधू द्वारा निर्मित या चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये दिल्ली आणि नोएडा येथे करण्यात येणार आहे. हा चित्रपट एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
दरम्यान, “क्या कूल है हम-3′, “मै और चार्ल्स’ आणि “रॉय’ यासारख्या हिट चित्रपटानंतर मंदाना खासगी कारणांमुळे ब्रेक घेतला होता. याबाबत मंदाना म्हणाली, जेव्हा माझे करियर यशाच्या टप्प्यावर होते आणि सर्व काही चांगले सुरू असताना मी लग्न केले. त्यानंतर माझे पती गौरव गुप्ता यांनी मला चित्रपटात काम करण्यास नकार दर्शविला. त्यामुळे आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता मी पुन्हा एकदा नव्याने काम करण्यास सुरूवात केली असून शूटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहे.