निमसाखर – निमसाखर (ता. इंदापूर) येथे बारामतीच्या बाबालाल काकडे निरा कॅनॉल सोसायट्यांच्या सहकारी खरेदी विक्री संघाकडून निमसाखर येथे खत डेपोचे उद्घाटन करण्यात आले.
या डेपोमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना स्वस्तात रासायनिक खते व बी- बियाणे मिळणार आहेत. यावेळी निमसाखर येथे निरवांगी रोड लगत नीरा कॅनॉल संघाच्या निमसाखर खत डेपोचे उद्घाटन निमसाखर सोसायटीचे चेअरमन विजयसिंह रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बनसोडे सर, नंदकुमार लावंड, हर्षल रणवरे यांची भाषणे झाली. यावेळी बाबालाल काकडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सतीश काकडे, शशिकात धुमाळ, अशोक मुळीक, दादासाहेब खोमणे, दिग्विजय जगताप, पांडुरंग निंबाळकर, दादासाहेब कोकरे, शामराव काकडे, मारुती लकडे, संघाचे कार्यकारी संचालक सुरेश काकडे, यशवंत सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार रणवरे, रणजित रणवरे, विनोद रणसिंग, नंदकुमार लावंड, महादेव रणवरे, पंकज रणवरे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिल्लारे, गोरख शेळके उपस्थित होते. माजी उपसभापती जयकुमार कारंडे यांनी आभार मानले.