वेरॉक संघाचा पीवायसीवर दणदणीत विजय

पुणे – येथे सुरु असलेल्या स्टार्स क्रिकेट ऍकॅडमीने आयोजित केलेल्या 45 षटकांच्या एकदिवसीय मालिकेत पीवायसी आणि वेरॉक यांच्यात झालेल्या सामन्यात हर्शवर्धन पाटीलच्या भेदक गोलंदाजीनंतर यश जगदाळेच्या संयमी खेळीने वेरॉकच्या संघाने पेवायसीच्या संघाचा एकतर्फी पराभव करताना मालिकेत विजयी आगेकूच नोंदवली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पीवायसीच्या संघाला 40.5 षटकांत सर्वबाद 112 धावांचीच मजल मारता आली. यावेळी 113 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या वेरॉकच्या संघाने हे आव्हान केवळ 2 गडी गमावून 27.2 षटकांतच पूर्न करताना सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी 113 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेरॉकच्या संघाने सावध सुरुवात केली. त्यांचे सलामीवीर अद्वैत मुळे आणि सौरभ नवलेयांनी सावध फलंदाजी करताना चांगली सुरुवात करुन दिली. यावेळी अद्वैतने 36 चेंडूत 17 धावांची खेळी केली. तर, सौरभने 38 चेंडूंचा सामना करताना 31 धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यावेळी अद्वैतला अब्दुस सलमने बाद केले.

अमेय भावेने सौरभला बाद करत सम्घाला महत्वपूर्न बळी मिलवून दिला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या किरन मोरे आणि यश जगदाळे यांनी सावध फलंदाजी करत आणखीन एकही बळी न पडू देता संघाच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला. यावेळी किरनने नाबाद 26 धावांची खेळी केली. तर, यशने 28 धावांची खेळीए करत चमकदार कामगिरी नोंदवली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पीवायसी संघाने सावध सुरुवात केली. परंतु, त्यांचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर त्यांची घसरगुंडी उडाली. यावेली अखिलेश पाटीलने 92 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर, आदित्य लोंढेने 16 धावांची महत्वपूर्ण खेळी करत त्याला साथ दिली.

आदित्य आणि अखिलेशयांच्या प्रतिकारामुळे पीवायसीच्या संघाला 112 धावांपर्यंत मजल मारता आली. हे दोन फलंदाज वगळता अन्य कोणतेही फलंदाज खेळपट्टीवर टीकाव धरु शकले नाहीत. यावेळी वेरॉक संघासाठी हर्षवर्धन पाटील याने 16 धावा देत 3 बळी मिळविले. तर, मनंग बारीने 27 धवा देत 3 बळी घेत त्याला उत्त्तम साथ दिली. तसेच, राहुल वारे आणि ऍलन रॉड्रीगेजयांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)