नवजोत सिंह सिद्धू यांची पंतप्रधान मोदींवर अर्वाचक भाषेत टीका
नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू काँग्रेस नेते आणि इंदौरमधील पंजाबचे मंत्री ‘ नवजोत सिंह सिद्धू ‘ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अर्वाचक भाषेत टीका केली आहे. काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी केले आहे. इंदुर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार पंकज संघवी यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
Punjab Minister and Congress leader Navjot Singh Sidhu in Indore: Congress is the party that gave freedom to the country, it is the party of Maulana Azad & Mahatma Gandhi, unhone ‘goron’ se aazadi di thi aur tum Indore walo ab ‘kale angrezo’ se iss desh ko nijaat dilayoge. (10.5) pic.twitter.com/wjsmmfxZxC
— ANI (@ANI) May 11, 2019
याच दरम्यान, इंदौरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना, नरेंद्र मोदी हे एका नव्या नवरी प्रमाणे असून, जी काम कमी करते आणि बांगड्यांचा आवाज जास्त करते. जेणे करून शेजारच्यांनी वाटते कि, ते काम जास्ती प्रमाणात करत आहे. २०१४ पासून ते आतापर्यंत मोदी सरकारच्या काळात फक्त एवढेच घडलं आहे. अशी खोचक टीका असं नजोत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर केली आहे.
Punjab Minister & Congress leader Navjot Singh Sidhu in Indore, MP: Modi Ji uss dulhan ki tarah hain jo roti kum baelti hai aur chudiyaan zada khankati hai taaki mohalle walon ko yeh pata chale ki woh kaam kar rahi hai. Bas yahi hua hai Modi sarkaar mein. pic.twitter.com/WOPJXbMm1x
— ANI (@ANI) May 11, 2019